Tuesday, February 02, 2010

तू काही आली नाहीस नाही तुझे पत्र आले

तारखा उलटता उलटता
दिवस बोलता हफ्ते गेले
हफ्त्यान बरोबर महिने हि
महिन्यान बरोबर वर्ष हि गेले
तू काही आली नाहीस,
नाही तुझे पत्र आले

तुज्या वियोगात नाही जेवणाचे घास
नाही पाण्याचे घोट गेले
तू दिलेले गुलाब,
पुस्तकातच सुकून गेले
तुज्या केसांचा सुवास,
अजूनही माज्या जवळ पास आहे
पाठून येऊन डोळ्यावर हात ठेवण्याचा आभास
अजूनही माज्या पापण्यांवर आहे
ते दिवस आता कुठे गेले
तू काही आली नाहीस
नाही तुझे पत्र आले

डोळ्यांच्या आसवांचा घोट
स्वता डोळेच पीत गेले
ओठांवर आलेले शब्द
ओठांतच गुदमरून गेले
प्रत्येक वाटेवर वाट पाहून
डोळे माझे थकले गेले
काय माझ्या मनाचे रडू
तुला नाही ऐकू आले?
तू काही आली नाहीस
नाही तुझे पत्र आले


No comments: