Tuesday, February 02, 2010

तरीही......

तू किती हसमुख आहे
तरीही, तुझ्या जीवनात दुःखाचा शुल्लक वाटा आहे

तुझ्या मुखावर सुंदर हसू आहे
तरीही, कुरुप्तेचा एक मुर्म तुझ्या गालावर आहे

तू किती परिपूर्ण आहे
तरीही, अपंगवताचा एक अंश तुझ्या शरीरात आहे

तू प्रुथ्वी येवडी मोठी आहे
तरीही, अखंड ब्रम्हांडात तू मातीचा एक कण आहे

तू जीवनाचा अनुभवी विकास आहे
तरीही, ह्या मातीच्या शरीराला दुर्दय्वी अंत आहे


No comments: