एक एक क्षण सरून गेला
तसा काळ हि उलटला
मैत्रीत तुझ्या न माझ्या
एक दुरावा हा उमटला
आपण असेच राहावे
हि इच्छा कधीच नव्हती
प्रत्येक प्रसंगी वाटे मला
तू असावी माझ्या भवती
वेळ अजून गेली नाही
गेला नाही काळ अजून
फ़क़्त मैत्री हवी तुझी
हे एकच मागणं मनापासून